जरांगे फॅक्टर ठरवणार बीडचा पुढील खासदार ? | Pankaja Munde | Loksabha Election 2024 | Vishaych Bhari

Описание к видео जरांगे फॅक्टर ठरवणार बीडचा पुढील खासदार ? | Pankaja Munde | Loksabha Election 2024 | Vishaych Bhari

जरांगे फॅक्टर ठरवणार बीडचा पुढील खासदार ? | Pankaja Munde | Loksabha Election 2024 | Vishaych Bhari

2023 च्या ऑगस्ट महिन्यात अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील उपोषण करत होते. दरम्यान त्यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. त्यातून त्या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. त्यात शेकडो मराठा आंदोलक जखमी झाले आणि मनोज जरांगे पाटील हे नाव राज्यभर पसरले. राज्यातील मोठमोठ्या नेत्यांची पावलं अंतरवाली सराटीकडे वळली. आरोप प्रत्यारोप झाले. त्यातून या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले. तसेच मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे एकमुखी नेतृत्व बनले. तसेच आंदोलन व्यापक झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपली मागणीही व्यापक करत संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली. तेव्हापासूनच राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष सुरू झाला. तो अद्याप सुरू आहे. दरम्यानच्या काळात या आंदोलनाचे अनेक टप्पे पार पडले, काही मागण्या मान्य झाल्या, काही तशाच राहिल्या. तर महायुतीच्या सरकारनं आगामी निवडणुका लक्षात घेता मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देत मराठा समाजाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून जरांगे पाटील यांचं आंदोलन काही शमलं नाही. यादरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेला भाजपा आणि विशेषकरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील यांचा रोष असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर हा भाजपा आणि एकंदरीत महायुतीला जड जाणार असे बोलले जात होते. त्यात जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवा असं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. लोकसभा निवडणुकीचं आतापर्यंत झालेलं मतदान आणि इतर भागात सुरू असलेला प्रचार यामधून मराठा आरक्षणाच्या प्रश्चाचा आणि जरांगे पाटील यांच्या आवाहनाचा प्रभाव दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यात विशेषकरून मराठवाड्यातील काही मतदारसंघात जरांगे फॅक्टरचाहा प्रभाव तीव्रतेने जाणवेल, असे संकेत मिळत आहेत. त्या दृष्टीनं महत्वाचा ठरणारा एक मतदारसंघ म्हणजे बीड. बीड लोकसभा मतदारसंघात जातीपातीच्या राजकारणाची भावना आधीपासूनच बऱ्यापैकी खोलवर रुजलेली होती. त्यात आता मराठा आरक्षण आंदोलनामुळे जातीपातीची भावना अधिकच तीव्र झालेली आहे. दरम्यान, हाच जरांगे फॅक्टर आता बीडमधील पुढील खासदार ठरवणार असं बोललं जातय. पण त्याची नेमकी काय कारणे आहेत. पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांनी जरांगे पाटलांची भेट का घेतलीये. पडद्यामागं काय घडतंय, सविस्तर जाणून घेऊयात..

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday

Комментарии

Информация по комментариям в разработке