Narendra Modi यांच्या सभेमुळं Dharashiv Loksabha चं वातावरण फिरणार? सभेनंतरची समीकरणं काय सांगतात?

Описание к видео Narendra Modi यांच्या सभेमुळं Dharashiv Loksabha चं वातावरण फिरणार? सभेनंतरची समीकरणं काय सांगतात?

#BolBhidu #NarendraModiDharashivSabha #DharashivLoksabha

आज माढ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी सभा पार पडली, धाराशीव लोकसभेत. यंदाच्या निवडणुकीतही धाराशिवमधला सामना सगळ्या राज्यात चर्चेत आहे. ठाकरे गटानं इथून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलंय, तर अजित पवार गटानं इथून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकांवेळीही धाराशीवमधला सामना निंबाळकर घराणं विरुद्ध पाटील घराणं असाच झाला होता. पण यावेळी बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे ओमराजे निंबाळकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर अर्चना पाटील या महायुतीच्या उमेदवार आहेत.

दोन्ही बाजूंनी प्रचारातही जान भरली गेली, दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरताना जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यानंतर जाहीर सभा, कोपरा सभा, बैठका आणि आरोप-प्रत्यारोप यामुळं धाराशिवचं वातावरण रंगलं होतं. ओमराजे निंबाळकर यांचा असणारा दांडगा जनसंपर्क आणि उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती यामुळं ओमराजे यांचं पारडं जड असल्याची चर्चा धाराशिवबद्दल होत होती. पण मंगळवारी ३० एप्रिलला झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेमुळं धाराशिवचं चित्र बदलणार का ? या चर्चांनी जोर धरला आहे. पण मोदींच्या सभेमुळं असं काय घडलं की वारं फिरल्याची चर्चा व्हायला लागली आहे ? पाहुयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке